बावीस वर्षांपूर्वी या लेखकानं आपल्याला आरसा दाखवला आहे. आपण त्यात कसे दिसतो, हे आता तरी गंभीरपणे आपण पाहणार आहोत का?
संजय पवारांनी लिहिलेल्या या लोकप्रिय सदराचं नाव होतं, ‘एकलव्याच्या भात्यातून’. सदराच्या नावापासूनच ते कोणत्या समुदायाची, कोणत्या समाजघटकांची, कोणत्या दुःखांची फिर्याद करणार, हे स्पष्ट होत जातं. त्याच वेळेला एकलव्याचा भाता बाणांनी भरलेला आहे, अशी ठोस जाणीवही करून देतं. या सदरातील प्रत्येक लेखाच्या शेवटी तिखट शेरा मारणारा एक शेवटचा तीर लेखकानं सोडला आहे. उपहासगर्भ विनोदात तो मोडतो आणि कधीकधी मूळ लेखापेक्षा अधिक.......